आई होऊन चुकले का मी? पोर पोटची देत न ओळख, आईपणाला मुकले का मी? नऊ मासाचा, पहिलेपणीचा, गर्भभारही मीच वाहिला पदराआडून अमृत पान्हा या मायेने जिला पाजिला तळहाताच्या फोडापरी हो या लेकीला जपले का मी? पती विरहाचे दु:ख विसरूनि शोधित आले तुजला पोरी 'आई' म्हण तू या आईला, सांगायाची झाली चोरी अभागिनीचे सुख हे इवले तुलाही देवा खुपले का?