PrintSource

आईपण दे रे

Aaipan De Re

ग. दि. माडगूळकर

आईपण दे रे, देवा, नवस किती करू?
फूल वेलीला येऊ दे, एक होऊ दे लेकरू

वांझपणाचं औक्ष असू-नसून सारखं
बाळावाचुनिया घर सर्व सुखाला पारखं

बाळा अंगीच्या धुळीनं ज्यांची मळतात अंगं
त्यांच्याहुन दुनियेत कोण भाग्यवंत सांग?