PrintSource

आज मी तुझ्यासवे

Aaj Mi Tujhyasave

रजनीकांत राजाध्यक्ष

आज मी तुझ्यासवे, तुझ्यात मी विसावले
सतत तुझ्या मीलनी, गंध धुंद दरवळे

फूल हे मनातले, मिठीत ते तुझ्या हसे
या सुखात भिजताना लागले तुझे पिसे
राजसा, तुझ्यामुळे भाग्य मला लाभले

राहिला तुझा न तू, मी न माझी राहिले
दोन मने जुळताना कधी न कुणी पाहिले
नाही येत सांगता, कोण कधी हरवले