Back
Fitting…

1 page

आज पेटली उत्तर सीमा

आज पेटली उत्तर सीमा, रणांगणाचे आमंत्रण
सह्याद्रीच्या रणरूद्रा तुज हिमालयाचे हे आवाहन

कैलासाला आग लागली, शिवावरी अशिवाची स्वारी
शिवराष्ट्राच्या समर देवते गौरीशंकर तुला पुकारी

आता कर शिवशक्ते तांडव, खड्गहस्त आपुला उगारी
करिता 'हर हर महादेव' ही संग्रामाची झडे तुतारी

सह्याद्रीच्या समरवीरांनो हिमालयाच्या ऐका हाका
गर्जत जय जय स्वतंत्र भारत, दुष्मानावर प्रहार टाका

मंगलतेचा गड रक्षाया आज करा रक्ताचे सींचन
जागृत होई मराठदेशा, रणचंडी कर तांडव नर्तन