आज प्रीतीला पंख हे
आज प्रीतीला पंख हे लाभले रे झेप घेउनी पाखरू चालले रे उंच मनोरे नव्या जगाचे चिरंजीव हे स्वप्न सुखाचे तुझी होउनी आज मी राहिले रे असा लाजरा-बावरा प्रणय असावा तुझी सावली त्यात मी घेत विसावा असे आगळे चित्र मी पाहिले रे दोन जिवांनी एक असावे मस्त होउनी धुंद फिरावे पंचप्राण हे पायी मी वाहिले रे