आला आला वारा
आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप ओठी हसू पापणीत आसवांचा झरा आजवरी यांना किती जपलं जपलं काळजाचं पाणी किती शिंपलं शिंपलं चेतवून प्राण यांना दिला ग उबारा येगळी माती आता ग येगळी दुनिया आभाळाची माया बाई करील किमया फुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा