आला पाऊस मातीच्या वासात ग मोती गुंफीत मोकळ्या केसात ग ! आभाळात आले काळेकाळे ढग धारा कोसळल्या निवे तगमग धुंद दरवळ धरणीच्या श्वासात ग ! कोसळल्या कशा सरीवर सरी थेंब थेंब करी नाच पाण्यावरी लाल ओहळ वाहती जोसात ग ! लिंबोळ्यांची रास कडूलिंबाखाली वारा दंगा करी, जुई शहारली चाफा झुरतो फुलांच्या भासात ग ! झाडावरी मुके पाखरांचे थवे वीज लालनिळी कशी नाचे लवे तेजाळते उभ्या अवकाशात ग ! वीज कडाडता भय दाटे उरी एकली मी इथे, सखा राहे दुरी मन व्याकुळ सजणाच्या ध्यासात ग !