आले वयात मी, बाळपणाची संगत सुटली गोर्या गाली प्रीतीची लाली अवचित उठली ! निशिदिनी बाई मी मनामध्ये तळमळते ही नवखीच कसली हुरहुर मज जाळते जीव होतो गोळा झोप नाही डोळा येतो दाटुन गळा सख्यासोबतिणींची मला संगत नकोशी वाटली ! तू जिवलग माझा, बाळपणातील मैत्र बोल हसुन जरा, बघ फुलांत नटला चैत्र एका ठायी बसू गालागालांत हसू डोळा मोडून पुसू चार डोळे भेटता दोन मने एकवटली !