आलीस सांजवेळी घेऊन स्वप्न माझे तव अंतरी परंतु जाणीव मात्र लाजे किती लालबुंद होशी, भित्रीच तू अखेर ओठांतुनी फुटेना जरी शब्द तो अधीर डोळ्यांत गंधवेडी मुग्धा तुझ्या विराजे तळव्यावरी तुझ्या ग रंगेल धुंद मेंदी माझ्याही या करांना लावी खुशाल नादी हृदयी चितारलेले ते चित्र आज साजे स्वप्नांतल्या छटांना गिरवून सांजतारा लागे सूरांत गाऊ फुलवूनिया पिसारा तेजात नाहती त्या, स्वर मी तुला दिले जे