PrintSource

आम्ही कोळ्याची पोरं हाय्‌ हो

Aamhi Kolyachi Pora Hay Ho

मंगेश पाडगांवकर

वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा
वल्हव रे नाखवा, वल्हव

आम्ही कोळ्याची पोरं हाय्‌ हो
अम्हा दर्याची भीती नाय हो

वर आभाळ भरलंय्‌ हो
जाळं जोरात धरलंय्‌ हो
कोण करील अम्हा काय हो?

लाट जोसात येऊ द्या
झेप खुशाल घेऊ द्या
मागे घेणार न्हाई पाय हो

देव मल्हारी पावला हो
मासा जाळ्यात गावला हो
होडी मजेत पुढे जाय हो