PrintSource

आमुची माळियाची जात

Aamuchi Maliyachi Jaat

संत सावता माळी

आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥१॥

आम्हां हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलझाडां ॥२॥

शांति शेवंतीं फुलली । प्रेम जाई-जुई व्याली ॥३॥

सावत्याने केला मळा । विठ्ठल देखियेला डोळां ॥४॥