आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंदचि अंग आनंदाचें ॥१॥ काय सांगो जालें कांहींचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥ गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥ तुका ह्मणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥