आसमंती आज राती शुभ्र
आसमंती आज राती शुभ्र धारा खोल पात्री हा स्वरांचा ये शहारा रूप ना हे पाहिले मी सूर ना हे ऐकिले मी येत कानी दशदिशांचा हा पुकारा गारगोटी तू, नव्हे आकाश तारा आंधळी अन वेंधळी मी मृत्तिकेची बाहुली मी व्यर्थ मी शृंगार केला जाळणारा कल्पनेचा सर्व गळला तो पिसारा अप्सरा ना मेनका ना रुपवंती बालिका ना आणि कृष्णाची न राधा, मी न मीरा तोडुनी तारुण्य गेले हृदयतारा मी कुणी सामान्य पोर कापिले मी सर्व दोर गर्व गेला, आज गेला नूर सारा बांधिले गेले शरीरा अंधकारा