आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले? माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले? हदयात विझला चंद्रमा.. नयनी न उरल्या तारका.. नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले ! होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला, एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले ! ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे.. मी मात्र थांबुन पाहतो- मागे कितीजण राहिले?