आता कसली चोरी ग
त्याची माझी प्रीत अलौकिक, दिशा जाणती चारी ग आता कसली चोरी ग ! तो नगरीचा झाला राजा मी म्हणते पण केवळ माझा त्याच्या भवती धरिती फेरा, स्वप्ने माझी सारी ग आता कसली चोरी ग ! फुलात दिसती त्याचे डोळे सुगंधात सहवास दरवळे स्मरणे त्याच्या घेई लालिमा, कांती माझी गोरी ग आता कसली चोरी ग ! वावरता मी त्याच्या मागे पदापदावर सुदैव जागे सप्तपदीला विलंब का मग तोरण विलसो दारी ग आता कसली चोरी ग !