आता विसांव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी, सुखे गोवीत ओवीत त्यांची ओढितों स्मरणी. काय सांगावें नवल ! दूर रानींचीं पाखरें ओल्या अंगणी नाचतां होती माझींच नातरें. कधीं होती डोळे ओले, मन मानसाची तळी, माझे पैलांतले हंस डोल घेती त्याच्या जळीं. कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली आश्वासती, "येत्या जन्मीं होऊं तुमच्याच मुली." मणी ओढतां ओढतां होती त्याचींच आसवें, दूर असाल तिथें हो नांदतों मी तुम्हांसवें.