आवाज मुरलीचा आला
आवाज मुरलीचा आला हा बासरीवाला आला आलापित गोड सूराला मोहरुनि मनी लता विकसली स्वरसुमने किती तीवरी फुलली कशी भ्रांत पडे भ्रमराला जलवंतीची मंजुळ गाणी नादिती या खळखळ्यातुनी कशी येई लहर यमुनेला नादब्रह्मी त्या भान हरपता जीवाशिवाची एकरूपता मग अंत न पार सुखाला