PrintSource

आयुष्य तेच आहे

Aayushya Tech Aahe

संगीता जोशी

आयुष्य तेच आहे
अन्‌ हाच पेच आहे..

बोलू घरी कुणाशी?
तेही सुनेच आहे..

तू भेटशी नव्याने
बाकी जुनेच आहे..

केलीस याद तूही
का हे खरेच आहे?