अधिक देखणें तरी निरंजन पाहणें । योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥ देहबळी देउनी साधिलें म्यां साधनीं । तेणें समाधान मज जोडलें वो माये ॥२॥ अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें । सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये ॥३॥ चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला । तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥ पुरे पुरे आतां प्रपंच पाहणें । निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥ ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू । विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥