अज्ञात तीर्थयात्रा
अज्ञात तीर्थयात्रा आभाळ गूढ वरती मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती काही खरे न येथे ही राख सत्य आहे बाजार बाहुल्यांचा आभाळ फक्त पाहे सारे झरे सुखाचे दु:खाकडेच वळती हा ऊन-सावल्यांचा उकलेल गोफ का हो? डोहातल्या कुणाला गवसेल काठ का हो? नावा रित्याच येती आणि रित्याच जाती