अग्गोबाई ढग्गोबाई (२)
अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ ! थोडी न् थोडकी, लागली फार ! डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार !! डोंगरातून धावले पाण्याचे लोट पिऊन पिऊन फुगलंय नदीचं पोट नदीभर केला कुणी चहा चहा चहा बगळेबुवा एक कप पिऊन तरी पहा भरलेले ढग जरा बाजुला करून आले पाणी पहायला ओले ओले उन्ह ! उन्ह-पाणी आभाळाने भरता खिशात निळ्या निळ्या शर्टावर रंग आले सात !