अहो, इथं मांडिला इष्कबाजिचा अन् श्रृंगाराचा हाट ! मोल पुरेसे मोजा आणिक, खुशाल लावा हात ! माल मांडला नवानवा गाल नरम जणू गरम खवा हा ओठाचा शराबपेला भरला कांठोकाठ ! नारिंगाची रसाळ जोडी बघा रसरसे तयात गोडी तुमचे जपतप फळास आले सुबक तयाचा घाट ! मदनधनूसम भुंवई छान लखलखते नयनांचे बाण काय हवे तुज बोल राजसा ! नको उद्याची बात !