PrintSource

ऐकशील का रे माझे

Aikashil Majhe Ka Re

ग. दि. माडगूळकर

ऐकशील का रे माझे अर्थहीन गीत?
दूर दूर जाते धरुनी उरी तुझी प्रीत !

वाट तुझी बघता दारी पाय थकुन गेले
निमंत्रणावाचुनी जवळी मरण मात्र आले
फेकलेस चरणावरचे फूल तू धुळीत !

भाग्य हेच अजुनि येतो गंध पाकळीस
स्पर्श तुझा झाला होता चुकुन या कळीस
उमलताच सुकले तरीही आयु हे पुनीत !

सूर आर्त गीताचा या तुझ्या घरी यावा
अश्रुबिंदु एकच नयनी तुझ्या ओघळावा
हेतु एक शेवटचा या थरथरे मनात !