ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे ! लेऊ लेणं गरिबीचं चणं खाऊ लोखंडाचं जिणं व्हावं आबरूचं धनी मातुर माझा देवा, वाघावाणी असू दे ! लक्ष्मीच्या हातातली चवरी व्हावी वरखाली इडापीडा जाईल, आली- किरपा तुझी, भात्यातल्या सुरासंगं गाऊ दे ! सुख थोडं, दु:ख भारी दुनिया ही भली-बुरी घाव बसंल घावावरी- सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे !