ऐसे काही व्हावे
ऐसे काही व्हावे मन शांत निजावे एकांताच्या वेळी आकांत निमावे बघ संध्येच्या वक्षी कुणी भिरभिरता पक्षी वाटे त्याचे गाव पुसावे असल्या वेळी मंद गती विरून जाती तीन मिती पाचही प्राणांच्या ज्योती सौम्यपणाने मिणमिणती अस्वस्थाचे ओझे क्षणी विसरून जावे कोण आपुले? परके कोण? परिचित कोणी? उपरे कोण? असते कोण? नसते कोण? असल्यावेळी उरते कोण? पैलामधले काही मग उजळून जावे