अजि आले गं सखि माझे प्रियकर दूर देशीचे राजे शमला गं संताप पाहुनी मीलन सूख ते घेता मिळुनी अधरावरती आनंदाचे मंगल गीत विराजे घनगर्जित ऐकुनी बावरी उन्मन होउनी मत्त मयुरी नाचे थय थय उन्मादाने, रुणुझुणु पैंजण वाजे भेटताच सखि प्राण जीवना पळात विझल्या सकल वेदना अश्रूंची जाहली फुले ग, दु:ख मनोमनी लाजे चंद्र पाहता फुले कमलिनी तशीच मीही गेले फुलुनी दलादलावर स्पर्श उमटला, मला मिळाले माझे हरि कैवारी भक्तजनांचा रहिवासी तो सकल मनांचा मीरा विरहिणी मुक्त जाहली, द्वैत गळाले माझे