अजुनी रुसून आहे खुलतां कळीं खुले ना मिटले तसेच ओठ की पाकळी हले ना ! समजूत मीं करावी म्हणुनीच तूं रुसावें मीं हास सांगतांच रडतांहि तूं हसावें तें आज कां नसावें, समजावणी पटेना धरिला असा अबोला की बोल बोलवे ना ! की गूढ कांहि डाव, वरचा न हा तरंग घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग? रुसवा असा कसा हा ज्या आपलें कळेना? अजुनी रुसून आहे खुलतां कळीं खुलेना !