आजवरि पाहुनि वाट
आजवरि पाहुनि वाट देह किरे झुरला । जिवलगा । डोळयांत प्राण बघ उरला ॥ भरास आला खेळ, जाब हा कोणि तरी उकला । जिवलगा । माझाच डाव कां हुकला ॥ पुरती झाली सांज, कळप हा विसांवत बसला । जिवलगा । तो कीर कुणिकडे फसला ॥ बहरुनि आला बाग, चहुंकडे रंगरस झुकला । जिवलगा । माझाच मोगरा सुकला । (चाल) कां पाडिसि देवा, वज्रचुड्याला तडा । कुणिकडे उडाला मुद्रिकेतला खडा । हरपला मणिच मग उदास नागिणफडा । धरुनि भरवसा जीव ज्यावरति आजवर ठरला । जिवलगा । तो आज वायदा सरला ॥