अमरपदाचे वैभव माझ्या
अमरपदाचे वैभव माझ्या गाण्याला लाभले जीवन धन्य धन्य झाले ! महेशमूर्ती समोर दिसता उचंबळे उरी सुस्वर-सरिता धाव घेउनी तुम्हास मिळता, सर्व भरून पावले ! तुम्ही बोलविता, तुम्ही चालविता तुम्ही हसविता, तुम्ही खेळविता सूत्रधार तुम्ही, मी तर केवळ नादाचे बाहुले ! मायबाप तुम्ही, तुम्ही सद्गुरू कृपा पिउनी हा फुले सूरतरू तुम्ही दिले ते तुमच्या चरणी भक्तीने वाहिले !