अनाम वीरा जिथें जाहला तुझा जीवनान्त स्तंभ तिथें ना कुणी बांधला, पेटली ना वात ! धगधगतां समराच्या ज्वाला या देशाकाशीं जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी ! मूकपणानें तमीं लोपती संध्येच्या रेषा मरणामध्यें विलीन होसी, ना भय ना आशा ! जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव रियासतीवर नसे नोंदलें कुणी तुझें नांव ! जरी न गातिल भाट डफावर तुझें यशोगान ! सफल जाहलें तुझेंच हें रे तुझेंच बलिदान ! काळोखांतुनि विजयाचा ये पहाटचा तारा प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !