अंधाराच्या भवती आहे नवा नवा अंधार प्रकाश सगळा सोडून आला शांत शांत अंधार उजेडातल्या रखरखलेल्या, हटवादी अन् दुर्मुखलेल्या अगणित चेहर्यांच्या गर्दीला कवेत घेई अंधार काळोखातून झुळूक येते, हळूच डोळे पुसून जाते स्तब्ध स्तब्ध अन् हळवा हळवा कधी निवांत कधी आसुसला, मंद मंद अंधार