अंतरंगी तो प्रभाती
अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी डोळियांच्या दोन ज्योती लाविती त्याला कुणी पाहती देहात कोणी थोर साधक उन्मनी सानुल्या बिंदूपरी तो नांदतो संतांघरी नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी भावना भिजल्याभरांनी अश्रु नयनी दाटले अस्तिकाचे गीत गाता सार उमजे त्यातले सर्वसाक्षी श्याम माझा राहतो हृदयांतरी नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी