अणुमाजीं राम
अणुमाजीं राम रेणुमाजीं राम । तृणींकाष्ठीं राम वर्ततसे ॥१॥ बाहेरी अंतरीं राम चराचरीं । विश्वीं विश्वाकारीं व्यापलासे ॥२॥ रामेंविण स्थळ रितेंचि ते नाहीं । वर्ते सर्वांठायीं राम माझा ॥३॥ ब्रह्मा विष्णु रूद्र मूर्ती पैं जे ध्यानी अखंड जपती रामनाम॥४॥ परसा भागवत कायावाचामनें । श्रीरामावाचोनी आन नेणें ॥५॥