अपार हा भवसागर दुस्तर
अपार हा भवसागर दुस्तर तुझ्या कृपेविण कोण तरे, जय जय दुर्गे शुभंकरे ! तुझ्या कृपेने संकट टळते तुझ्या कृपेने वैभव येते तुझ्या कृपेने पंगू देखिल करी उल्लंघन गिरीशिखरे ! तुझ्या कृपेचा मेघ बरसता आशेची उद्याने फुलता ह्या संसारी विश्वमंदिरी, आनंदाचा गंध भरे ! दुराचार दंभाच्या नगरी अनाचार अवसेच्या तिमिरी त्रिशूळ तव चमकता अचानक दुरिताचा अंधार नुरे