अपराध मीच केला
अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी ! जाणीव हीच माझ्या जिवा सदैव जाळी ! जन्मांत एक झाली ही प्रीतभेट देवा डोळ्यांतुनी हळू या, हृदयात पाय ठेवा बोलू न द्यायची मी भलतेच लाभवेळी ! राष्ट्रार्थ जन्मलेला मी पाहुणा क्षणाचा भासांत गुंतवावा मी जीव का कुणाचा? अक्षम्य चूक झाली, मी प्रीत दाखवीली !