अपर्णा तप करिते काननी
भस्मविलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करिते काननी ! वैभवभूषित वैकुंठेश्वर तिच्या पित्याने योजियला वर भोळा शंकर परि उमेच्या भरलासे लोचनी ! त्रिशूल डमरू पिनाकपाणी चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनि युगायुगांचा भणंग जोगी तोच आवडे मनी ! कोमल सुंदर हिमनगदुहिता हिमाचलावर तप आचरिता आगीमधुनी फूल कोवळे फुलवी रात्रंदिनी !