अरसिक किति हा शेला
अरसिक किति हा शेला । त्या सुंदर तनुला सोडुनि आला ॥ प्रेमें प्राणपतीला । मीं संतोषें हा अर्पण केला । दुर्मिळ जें स्थळ मजला । तें सहज मिळुनि या दुर्भाग्याला । तेथुनि कां हा ढळला । त्या सत्संगतिला कैसा विटला । कोंडुन ठेविन याला । मज दृष्टिस नलगे निष्ठुर मेला ॥