अरे अरे ज्ञाना झालासी
अरे अरे ज्ञाना झालासी पावन । तुझें तुज ध्यान कळों आलें ॥१॥ तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फिटला संदेह अन्यतत्त्वी ॥२॥ मुरडूनियां मन उपजलासी चित्तें । कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥ दीपकीं दीपक मावळल्या ज्योती । घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥ वृत्तीचि निवृत्ति अपणांसकट । अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥ निवृत्ति परमानुभव नेमा । शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥