अरे खोप्यामधी खोपा
अरे खोप्यामधी खोपा सुगडिणीचा चांगला पहा पिल्लासाठी तिनं झोका झाडाला टांगला पिल्लं निजती खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिल्लांमधी जीव जीव झाडाला टांगला खोपा विणला विणला जसा गिलक्याचा कोसा पांखराची कारागिरी जरा बघ रे माणसा तिची उलूशीच चोच तेच दात, तेच ओठ तुले दिले रे देवानं दोन हात, दहा बोटं