अर्जुन तर संन्यासी होउनी रैवतकीं बसला । झालि सुभद्रा नष्ट असा ग्रह त्याच्या मनिं ठसला । वैराग्याचा पुतळा केवळ सांप्रत तो बनला । तत्त्वनिष्ठ वेदान्ती होउनि तुच्छ मानितो विषयाला । प्राणायामें कुभंक करुनी साधित योगाला । सुभद्रेची मूर्ती हृदयीं धरुनि करितसे ध्यानाला । ही एक गोष्ट मज अनुकूलचि जाहली । कीं ढोंग नसुनि खरि वृत्ति यतिस साधली । नासिकाग्र दृष्टी सर्वकाल लागली । भोळे अमुचे दादा तेथें जाति दर्शनाला । तरी खचित सांगतो तयाच्या लागति नादाला ॥