अशी न राहील रात्र
जा अशी झेलीत तू घण दु:खाचे नारी या दु:खातून उजळून येईल भाग्य तुझे संसारी अशी न राहील रात्र निरंतर प्रकाश येतो रात्रीनंतर लढता लढता येथे जगणे हसता हसता घाव सोसणे पाऊल पुढचे पुढे टाकणे जीवन हा संग्राम खरोखर चुकले नाही दु:ख कुणाला सीता, अहल्या, दमयंतीला ध्येयापासून नाही ढळल्या झेलुनिया संकटे शिरावर