"अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो" वदले छत्रपती ! शिवरायाच्या दरबारी त्या, युवती मोहक ती सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती शब्द ऐकता चकित झाली हरिणीसम ती रती ! वसंतातले यौवन होते नयनी मादकता रम्य अलौकिक मनमोहक ते कोमल बाहुलता सौंदर्याची प्रतिमा परि ती प्रभु माता मानिती ! अलंकार ते वस्त्रभूषणे देऊन मानाने परत सासरी पाठविले तिज शिवभूपालाने रायगडाच्या पाषाणांतून शब्द अजून येती !