अता राहिलो मी जरासा जरासा उरावा जसा मंद अंती उसासा कसा कोरडा कोरडा जन्म गेला कसा रोज मी पीत गेलो पिपासा कसे ओठ तू बंद केलेस माझे करावा कसा आसवांनी खुलासा? असे हे कसे जीवनाचे दिलासे? दिलाशांस मी देत आहे दिलासा !