अति कोपयुक्त होय परि सुखविते मला । भृकुटि वक्र करुनि बघत । गाल लाल सर्व होत । थरथर तनु कांपवीत इंदुवदनिं घर्म सूटला ॥ जणू कनकाची मूर्ति अग्निमाजिं तावली । कीं नभ सोडुनि वीजचि खालिं उतरली । कीं ज्वलनाची ज्वाला कुंडात पेटली ॥ एक जागिं पद न ठरत । हृदय भरत रिक्त होत । अधरबिंब काय फुटत ।तेंवि वरी दंत रोंविला ॥