अवघा आनंदी आनंद
अवघा आनंदी आनंद मना घेई हाचि छंद नलगे धनसंपदा शुद्ध बुद्धी देई सदा नांदो जनांत आनंद सत्य सदा समतानंद समदृष्टी विश्व पहावे दुसरा आपण होऊन जावे जीव शिवाला भेटतो तेथे होतो नामानंद जन्ममरण याचि देही सोसणारा दुजा नाही सोसविता मेळवितो दु:खामाजी नित्यानंद