अवघा तो शकुन
अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चिंतन ॥१॥ येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥२॥ छंद हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥३॥ तुका ह्मणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥४॥