PrintSource

आयुष्यावर बोलू काही

Ayushyavar Bolu Kahi

संदीप खरे

जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही

तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही

हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे कातर बोलू काही

उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही

शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही