अय्याबाई ! इश्श्बाई ! सांगू काय पुढे? गुलाबाचा रंग माझ्या गालांवर चढे काहीतरी झाले आहे कोणीतरी आले आहे त्याचे हसू गोड आहे मला त्याची ओढ आहे त्याचीमाझी जोड आहे सांगताना बोल बाई ओठांवर अडे ! माझ्यापाशी झेप आहे त्याच्या डोळ्यांत झोप आहे माझ्यापाशी वाण नाही त्याच्यापाशी जाण नाही साहसाचे त्राण नाही काय सांगू? भलतेच वेड मला जडे ! माझे मन गात आहे त्याच्या हाती साथ आहे माझ्या पायी चाळ आहे त्याच्या हाती ताल आहे अश्शी काही धमाल आहे त्याच्या मनाआड जाऊन माझे मन दडे !