बा रे पांडुरंगा केव्हां भेट देशी । झालों मी परदेशी तुझ्याविण ॥१॥ ओवाळावी काया चरणावरोनि । केव्हां चक्रपाणि भेटशील ॥२॥ तुका ह्मणे माझी पुरवावी आवडी । वेगें घालीं उडी नारायणा ॥३॥