बदलती नभाचे रंग कसे
बदलती नभाचे रंग कसे ! क्षणांत निळसर, क्षणांत लालस, क्षण सोनेरी दिसे ! अशा बदलत्या नभाखालती वसते अवनी सदा बदलती कळी कालची आज टपोरे फूल होउनी हसे ! मेघ मघा जे लवले माथी क्षणांत झाले धार वाहती फूल कालचे फळ होऊनिया भरले मधुर रसे ! काल वाटले स्पर्श नच करू त्या कीटाचे होय पांखरू वेगवेगळे रंग तयाचे, इंद्रधनू उडतसे !